शिर्डीहून साईंच्या पालखीचे 29 नोव्हेंबरला प्रस्थान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

दत्त जयंतीनिमित्त शिर्डी ते कराड साई पालखी सोहळा 

कराड/प्रतिनिधी : – 

येथील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्यावतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री क्षेत्र शिर्डी ते कराड श्री साई पालखी सोहळा शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर ते शनिवार, दि. 14 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार (दि. 29) सकाळी 8.30 वाजता श्री दत्त मंदिर – लेंडीबाग, शिर्डी येथून श्री साईबाबा पालखीचे कराडकडे दिमाखात प्रस्थान होईल. कोल्हापूरचे ज्ञानेश्वर हरी काटकर यांच्या प्रेरणेने व कोल्हापुरचे गोविंद वसुदेव रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पालखी पूजन व प्रस्थान : पालखी सोहळाल्या शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे – सोनटक्के, श्री साई पालखी सोहळा समितीचे संस्थापक, अध्यक्ष उदयसिंह देसाई यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व प्रस्थान कार्यक्रम होणार आहे. पालखी सोहळ्यात चहा व नाष्टा, सकाळी 9 वाजता, तर दुपारी 12 ते 3, तसेच सायंकाळी 4 वाजता अल्पोपहार व रात्री 8 वाजता महाप्रसाद व विसावा होणार आहे. 

पालखी कार्यक्रम : शिर्डी येथून साई पालखीचे प्रस्थान शुक्रवार (दि. 29) सकाळी 8.30 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारंभाने होणार आहे. दुपारी 12 वाजता साकुरी येथे, तर पिंपरी निर्मळ येथे रात्रीचा मुक्काम. शनिवार (दि. 30) दुपारी 12 कोल्हार येथे विसावा व रात्री गुहा येथे मुक्काम. रविवार (दि. 1 डिसेंबर) राहुरीला दुपारचा विसावा व नादागांव – शिघवे येथे मुकाम, सोमवार (दि. 2) सावेडी नाका येथे दुपारचा विसावा व अहिल्यानगर (अहमदनगर) येथे मुक्काम, मंगळवार (दि. 3) दुपारी चास येथे विसावा व सुपा येथे रात्रीचा मुक्काम, बुधवार (दि. 4) वाडेगव्हाण येथे दुपारचा विसावा व शिरूर येथे मुकाम, गुरुवार (दि. 5) आंबळे येथे दुपारचा विसावा व आंधळगाव येथे रात्रीचा मुक्काम, ओम शुक्रवार (दि. 6) चौफुला येथे दुपारचा विसावा व सुपे येथे रात्रीचा मुक्काम, शनिवार (दि. 7) मुर्टी येथे दुपारचा विसावा व रात्री निरा येथे मुक्काम, रविवार (दि. 8), लोणंदला दुपारचा विसावा व वाठार स्टेशन येथे रात्रीचा मुकाम, सोमवार (दि. 9) सातारा रोड येथे दुपारचा विसावा व कोरेगाव येथे मुकाम, मंगळवार (दि. 10) शिरंबे येथे दुपारचा विसावा व रहिमतपूर येथे मुक्काम, बुधवार (दि. 11) दुपारी वाठार किरोली येथे दुपारचा विसावा व मसूर येथे मुक्काम, गुरुवार (दि. 12) शिरवडे येथे दुपारचा विसावा व कोपर्डे- हवेली येथे मुक्काम, शुक्रवार (दि. 13) विद्यानगर-कराड येथे दुपारचा विसावा व कराडमधील श्रीराम मंदिर येथे साई पालखी व साई भक्तांचा मुक्काम, शनिवार (दि. 14) कराड येथील श्रीराम मंदिरात दत्त जयंती उत्सव, त्यात चिपळूण येथील वृंदा फडके यांचे दुपारी 4 ते 6 कीर्तन, तसेच आरती, प्रवचन, साईभक्ती गीतांचा कार्यक्रम व साईंचा भंडारा (महाप्रसाद) होईल. तरी भक्तांनी या विनामूल्य पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे. तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोबाईल नंबर 9860019441 यावर संपर्क साधण्याचे आवाहन साई पालखी सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!