कराड/प्रतिनिधी : –
डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल इंजिनिअर स्टुडंट्स असोसिएशन (MESA) यांच्यामार्फत पार्ले (ता. कराड) येथे मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.
नवमतदारांमध्येही जागृती : या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पार्ले येथील नागरिकांना मतदान जनजागृतीचे महत्व सांगण्यात आले. तसेच वृद्ध व अपंग व्यक्तींना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास मदत करावी, असे आवाहन युवकांना करण्यात आले. त्याचबरोबर ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे, मतदार यादीमध्ये ज्यांचे नव्याने नाव समाविष्ट झाले आहे, अश्या नवमतदारांना मतदान करण्यासाठी जागृत करण्यात आले.
उपक्रमात सहभाग : यावेळी MESA प्रेसिडेंट सुयश नलवडे, सृष्टी पाटील, हितेश महाजन, राजनंदिनी माने, जाहिद मुल्ला, हसन मुल्ला, करण चावरे, अनिकेत जाधव, आदित्य यादव, शारिक मुजावर, साक्षी मोहिते, श्रेया पाटील, अपूर्वा कदम, सना बागवान यांनी हा उपक्रम राबवला. त्यांच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.