कराड दक्षिणच्या शाश्वत विकासाचे धेय्य 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. अतुलबाबा भोसले; काले येथे प्रचाराची सांगता सभा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माता – भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, तसेच जनतेला त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी काम करण्याची जनतेने मला संधी द्यावी. कराड दक्षिणचा शाश्वत विकास हे माझे धेय्य असून तुमचा सेवक म्हणून काम करण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

प्रचार सांगता सभा : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ काले येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जनसमुदाय संबोधित करताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, गणपतराव हुलवान, सुलोचना पवार आदींची उपस्थिती होती.

दक्षिणेतील विकासकामांवर बोलायला उत्तर नाही : मोठे नेते असलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी  राज्यभरात फिरुन त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. परंतु, कराड दक्षिणमध्ये भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे त्यांचे बाहेर प्रचाराला जाण्याचे धाडसच होत नाही, हे आपले यश आहे. तुम्ही कराड दक्षिणसाठी काय भरीव योगदान दिले? कोणकोणती विकास कामे केली? याबद्दल त्यांना आपण विचारतोय. मात्र, त्याबद्दल त्यांच्याकडे द्यायचा ठोस उत्तरच नाही. यावरून 10 वर्षांत कराड दक्षिणमध्ये काय विकास झाला, हे आपल्या लक्षात येईल.

मोठा विकासनिधी आणल्याचे समाधान : गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात मोठा विकासनिधी आणल्याचे आपणाला समाधान वाटत असल्याचे सांगताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, या निधीतून रस्ते, पूल, पाणंद रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा मार्गी लागल्या. सध्या अनेक विकासकामे सुरु असून, बरीचशी पूर्णत्वास गेली असल्याचे लोकांना माहिती आहे.

काले : भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचार सांगता सभेला झालेली अलोट गर्दी.

लोकांना अनेक योजनांचा लाभ दिला : मोदी सरकारने महिला, शेतकरी, बांधकाम कामगार व विद्यार्थ्यांसाठी असंख्य योजना राबवल्या. या सर्व योजनांचा लाभ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले आणि मोठे प्रयत्न केल्याचे सांगत डॉ. सुरेश भोसले यांनी या निवडणुकीमध्ये जनकल्याणाचे आणि विकासाचे व्हिजन असलेल्या डॉ. अतुलबाबांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन केले.

तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली : तरुणांना संधी द्यायला पाहिजे, असे म्हणणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी तरुणांना संधी द्यायचे सोडून स्वत:च उमेदवारीचे तिकीट घेतले. असे सांगताना डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींनी तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी केल्याची घणाघाती टीकाही केली. 

जाहीर पाठिंबा : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाच्यावतीने डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

भाषण : प्रा. मच्छिंद्र सकटे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुहास जगताप, मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक दादासो शिंगण, शिवाजीराव थोरात, ॲड. दीपक थोरात, माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय निकम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!