रविराज सुतारचे यश; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
कराड/प्रतिनिधी : –
आदर्श ज्युनिअर कॉलेज, आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर (कराड) येथील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी रविराज संदीप सुतार याने हातोडा फेक (हॅमर थ्रो) या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला असून त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
बालेवाडीत पार पडल्या स्पर्धा : बालेवाडी पुणे येथे नुकत्याच झालेल्या 19 वर्षे वयोगटाखालील शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत हातोडा फेक (हॅमर थ्रो) या क्रीडा प्रकारात रविराजने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून त्याच्या यशाबद्दल मलकापूर व पंचक्रोशीत सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
मोलाचे मार्गदर्शन : रविराज सुतार या खेळाडूला क्रीडा शिक्षक दिलीप चिंचकर, प्रा. संजय थोरात, जे. एन. कराळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांकडून कौतुकाची थाप : या यशाबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव, शेतीमित्र अशोकराव थोरात, सर्व संचालक, प्राचार्या सौ. ए. एस. कुंभार, विभागप्रमुख सौ. एस. डी. पाटील, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी रविराज सुतारचे अभिनंदन केले. तसेच पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.
या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. आता राज्यस्तरीय स्पर्धेची तयारी सुरू असून ‘हॅमर थ्रो’ क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणार.
– रविराज सुतार (खेळाडू)