पाटणमध्ये धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

हर्षद कदम यांच्यासाठी महाविकास आघाडीची प्रचार सभा 

कराड/प्रतिनिधी : –

पाटण विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या मातब्बर लोकप्रतिनिधींना धूळ चारण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार हर्षद कदम यांनी चांगलेच रान उठवले आहे. आता या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याने येथील शिवसैनिकांमध्ये मोठे चैतन्य संचारले आहे.

दिग्गज नेत्यांना टशन : पाटण विधानसभा मतदारसंघात यावेळी राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई, तसेच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर आणि शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षद कदम यांच्यात होणारी लढत संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी ठरली आहे. सध्या येथे प्रचाराची रणधुमाळी सुरू असून मतदारसंघात मोठी वातावरण निर्मिती झाली आहे.

मल्हारपेठ येथे जाहीर सभा : रविवार, दि. 17 रोजी सकाळी 10.30 वाजता मल्हारपेठ (ता. पाटण) येथे हर्षद कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचारसभा होणार आहे. यातून शिवसैनिकांना चांगलीच नवसंजीवनी मिळणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता वाढली आहे.

घराणेशाही, बंडखोरी, भ्रष्टाचाराविरोधात उठवले रान : पाटण विधानसभा मतदारसंघात पिढ्यांपिढ्याची घराणेशाही असून येथील जनता त्याला वैतागली असल्याचे सांगत मतदारसंघातील परिस्थितीबाबत बोलताना हर्षद कदम म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींनी बंडखोरी, गद्दारी केल्यामुळे मतदारसंघावर मोठा कलंक लागला आहे. तसेच या ठिकाणी झालेल्या अनेक विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचारीही झाला आहे. या सर्व बाबतीत प्रचारसभा व कोपरा सभांच्या  माध्यमातून आपण चांगलेच रान उठवले आहे. तसेच ही निवडणूक आता निर्णय टप्प्यावर आली असून त्याचे नक्कीच गुलालात परिवर्तन होईल, असा विश्वासही श्री. कदम यांनी व्यक्त केला आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित रहा : या सभेला मतदारसंघातील जास्तीत जास्त युवक, शिवसैनिक, नागरिक, महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही उमेदवार हर्षद कदम यांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!