मधुमित्र डायबेटीस क्लिनिकतर्फे आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून डॉ. गौरी ताम्हनकर संचलित, मधुमित्र डायबेटीस क्लिनिकतर्फे प्रख्यात हृदयरोग तज्ञ व विचारवंत डॉ. जगदीश हिरेमठ यांचे ‘जीवनशैलीतील योग्य बदल व आपले आरोग्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मधुमित्र क्लिनिकच्या संचालिका डॉ. गौरी ताम्हनकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
शनिवारी होणार व्याख्यान : स्व. वेणूताई चव्हाण सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून शनिवार, दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता हे व्याख्यान होणार आहे.
सुमधुर संगीतासोबत आरोग्य व विचारांची मेजवानी : या कार्यक्रमात सुमधुर संगीताचा आनंद घेत या अत्यंत महत्वाच्या विषयावरील डॉ. जगदीश हिरेमठ यांचे दिशादर्शक विचार ऐकण्याची संधी कराडवासीयांना मिळणार आहे. सर्व कराडकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन आनंदी आणि तणावमुक्त करावे, असे आवाहन डॉ. ताम्हनकर यांनी केले आहे.
मधुमित्र डायबेटीस क्लिनिक, कराडतर्फे वर्षभर सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवले जातात. तसेच Type 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन, बालमधुमेहींसाठी (Type 1 मधुमेह) अद्ययावत उपचारपद्धती, गरोदरपणातील मधुमेहावर योग्य उपचार, पायांची आधुनिक उपकरणांद्वारे तपासणी, वजन कमी करण्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही केली जाते.
– डॉ. गौरी ताम्हनकर (संचालिका, मधुमित्र डायबेटीस क्लिनिक, कराड)