डॉ. अतुलबाबा भोसले; येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोलीत बैठक उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
विद्यमान आमदार गेल्या दहा वर्षांत केलेली कामेच पुन्हा या निवडणुकीत सांगत आहेत. त्यांच्याकडे विकासकामावर बोलण्यासाठी दुसरे काहीही नाही. त्यांनी एकालाही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. भूकंप संशोधन केंद्र उभारल्याचे, तसेच जुनीच विकासकामे अजून किती दिवस सांगणार? निवडून आल्यावर त्यांचा लोकांशी संपर्कच नाही. असे संपर्कहीन नेतृत्व काय कामाचे, अशी टीका डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.
प्रचार बैठक : उंडाळे भागातील येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोली येथे भाजप माहितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे, पंकज पाटील, येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, दिनकर पाटील, आण्णासो शेवाळे, पंजाबराव चोरगे, भास्कर शेवाळे, पै. अण्णा पाटील, अनिल वीर, पोपट शेवाळे, शेळकेवाडीच्या सरपंच सुनंदा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
भागातील गावे, वाड्यांच्या विकासासाठी कटिबद्ध : येत्या काळातही येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोली आणि या परिसरात असणाऱ्या सर्व गावांच्या व वाड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही भाजप – महायुतीचे कराड दक्षिण मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
योजना, विकासकामे लोकांपर्यंत पोहचवा : निवडणुकीत आता प्रचाराला कमी अवधी राहिला असून, आपण भाजपा महायुतीच्या सरकारने केलेल्या योजनांची व विकासकामांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून, मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही डॉ. अतुलबाबा भोसले त्यांनी केले.
मनोगत : येवती येथे संजय शेवाळे, सागर शेवाळे, पाटीलवाडी येथे सुभाष पाटील, वीरवाडी येथे परशुराम वीर, म्हासोली येथे दिनकर पाटील, सुनंदा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.
पक्षप्रवेश : यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, महादेव शेवाळे, जगन्नाथ शेवाळे, मारुती शेवाळे, दादासो शेवाळे, शिवाजी शेवाळे, मारूती देसाई, बाजीराव देसाई, संजय बोरगांवकर, मुंकु़द शेवाळे, रत्नापा कुंभार, पोपट शेवाळे, सुरेश मोहिते, जगन्नाथ घराळ, विलास शेवाळे, प्रदिप सोनवणे, सचिन जाधव, नितीन मोरे, राजेंद्र सोरटे, रमेश लोखंडे उपस्थित होते. येवती येथे संदीप शेवाळे, गणेश शेवाळे, महेश शेवाळे, काशीनाथ सोरटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मान्यवरांची उपस्थिती : पाटीलवाडी येथे प्रकाश पाटील, उत्तम पाटील, भानुदास पाटील, जगन्नाथ पाटील, अंकुश पाटील, शिवाजी पाटील, शंकर साठे, सिद्रम पाटील, महादेव शेवाळे, अभय पाटील, शंकर वीर, नितीन हिनुकले, विजय बाबर, माजी सरपंच सुभाष पाटील, प्रकाश पाटील, हणमंत पाटील, सुनिल पाटील, उत्तम पाटील, अनिल पाटील, बाळासो पाटील, मधुकर पाटील, महादेव शेवाळे, मोहन पाटील, बबन पाटील, डॉ. संजय पाटील, भास्करराव शेवाळे, वीरवाडी येथे परशुराम वीर, अनिल वीर, पोपट घराळ, रामचंद्र घराळ, तानाजी वीर, बबन हिनुकले, हणमंत पाटील, सुभाष पाटील, पै. आण्णा पाटील, म्हासोली येथे व्हा. चेअरमन उदय पाटील, दिनकर पाटील, अशोक धनवडे, दत्तात्रय शेवाळे, संजय शेटे, धनाजी मोहिते, भानुदास शेटे, सुखदेव बापू, अण्णासो शेवाळे, पांडुरंग माने, आण्णा पाटील आदी उपस्थित होते.