महाविकास आघाडीचा महिला मेळावा
कराड/प्रतिनिधी : –
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील महाविकास आघाडीचा महिला मेळावा आज रविवार, दि. 10 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची तोफ धडाडणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती : या मेळाव्याला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील – उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महिलांची असणार लक्षणीय उपस्थिती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे या स्पष्ट आणि परखड वक्त्या असून त्यांचे वक्तृत्व उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी या महिला मेळाव्याला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युवती, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा रविवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता हॉटेल पंकज मल्टीपर्पज हॉल, कराड येथे होणार आहे. तरी आपण युवती, महिला भगिनी व नागरिकांना या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.