सैदापुरच्या सरपंचांनी दिला ‘या नेत्याला’ जाहीर पाठिंबा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिणचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला. 

प्रचाराचा शुभारंभ : सैदापूर येथे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करत सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव व मानसिंगराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाबांचे कार्य विसरता येणार नाही : आ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड आणि परिसराचा कायापालट केल्याचे सांगत फत्तेसिंह जाधव म्हणाले, कराडला जोडणारे रस्ते केल्यामुळे विकासाला मोठी गती मिळाली. कराड ते ओगलेवाडी व मसूर या दोन्ही रस्त्यांमुळे सैदापूर परिसराचा कायापालट झाला असून त्यांचे हे कार्य विसरता येत नाही.

मंदिरे, मशीद, बौद्ध विहाराचे दर्शन : बाबांच्या आदर्शवत कार्यामुळे आम्ही सर्वांनी आ. चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरवून गावातील प्रचार शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित राहून पाठिंबा दिल्याचेही फत्तेसिंह जाधव यांनी सांगितले. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण हस्ते श्री हनुमान मंदिरात नारळ फोडण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकऱ्यांनी गावातील सर्व मंदिरे, मशीद, तसेच बौद्ध विहार येथे जावून दर्शन घेत प्रचार शुभारंभ केला.

पृथ्वीराज बाबांचा विजय पक्का :  यावेळी सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव, ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव, मानसिंगराव जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय पक्का झाल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!