डॉ. सुरेश भोसले; थोर विचारवंत यशवंतराव मोहिते यांना जयंतीनिमित्त अभिवादन
कराड/प्रतिनिधी : –
थोर विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंनी राज्याच्या सामाजिक व सहकार चळवळीत मोलाचे योगदान दिले. कृषी, सहकार क्षेत्रात त्यांनी लोकहिताच्या अनेक योजना राबविल्या. राज्याच्या प्रगतीमध्ये थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांची महत्वाची भूमिका होती, असे मत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.
जयंतीनिमित्त अभिवादन : रेठरे बुद्रुक येथे थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या निवासस्थानी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण डॉ. सुरेश भोसले यांनी अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते.
भाऊंच्या आठवणींना उजाळा : डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. विश्र्वेंद्र मोहिते यांच्याशी चर्चा करत त्यांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.
मान्यवरांनी केलेल्या अभिवादन : माजी आ. आनंदराव पाटील (नाना), कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनीही स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भाऊंच्या प्रतिमेस अभिवादन केले.