कराड/प्रतिनिधी : –
महाविकास आघाडीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मुंढे (ता. कराड) येथील सरपंच मनिषा संभाजी जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी आ. चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला असून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, माजी उपसरपंच शिवाजीराव जमाले, आनंदराव घोडके, शिवाजी जमाले, आण्णासाहेब जमाले, संभाजी जमाले, विकास लोंढे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बडेकर, पूजा जांभळे, दत्तात्रय माळी, अमजद मुल्ला, प्रल्हाद वाघमारे, अनिकेत चव्हाण, अधिक सावंत, गणेश पवार उपस्थित होते.
नुरानी मोहल्ला येथे भेट : आ. चव्हाण यांनी नुरानी मोहल्ला येथेही भेट दिली. यावेळी अफजल बागवान, आरबाज मोमीन, अदनान बागवान, शाहबाज मोकाशी व ग्रामस्थ, समाजबांधव उपस्थित होते.