कराड दक्षिणमधून चौथ्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

दक्षिणसाठी 65; तर उत्तरसाठी 60 अर्जांची विक्री 

कराड/प्रतिनिधी : –

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवार, दि. 25 रोजी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर 5 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. तसेच 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. एकूण 11 व्यक्तींनी 15 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत.

65 नामनिर्देशन पत्रांचे वाटप : याबाबतची माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरु झाले असून पहिल्या दिवशी 30, दुसऱ्या दिवशी 22, तिसऱ्या दिवशी 8, तर आज चौथ्या दिवशी 3 जणांनी एकूण 5 नामनिर्देशनपत्रे घेतली असून आजअखेर एकूण 65 नामनिर्देशन पत्रांचे वाटप झाले आहे.

कराड दक्षिणमधून 10 अर्ज दाखल : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 8 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून 2 उमेदवारांनी 4 अर्ज व 6 अपक्ष उमेदवारांनी 6 अर्ज दाखल केले आहेत. तर आज विद्याधर कृष्णा गायकवाड (बहुजन समाज पार्टी) आणि गणेश शिवाजी कापसे (अपक्ष) त्यांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके यांनी दिली.

तर 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चौथ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. आज शुक्रवारी एकूण 11 व्यक्तींनी 15 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत. आजअखेर एकूण 3 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून एकूण 43 व्यक्तींनी 60 नामनिर्देशनपत्रे घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख व अनिकेत पाटील यांनी दिली आहे.

चहा विक्रेत्याने घेतला नरेंद्र मोदींचा आदर्श 

एका रेल्वे स्टेशनवर चहा विक्रीचे काम करणारा व्यक्ती पुढे जाऊन देशाचा पंतप्रधान होतो. ही कमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधली आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवतेज सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या, तसेच हिंदुत्ववादी चेहरा म्हणून परिचित असलेल्या कराड शहरातील गणेश कापसे या चहा विक्रेत्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या या उमेदीचे लोकांकडून कौतुक होत आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!