कराड दक्षिणसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 6 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसून एकूण 8 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघातील अर्ज दाखल व विक्री बाबतची माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके म्हणाले, गुरुवार, दि. 24 रोजीअखेर खुल्या प्रवर्गातील 36, अनुसूचित जातीतील 17, अनुसूचित जमाती 0, अपक्ष उमेदवार 23, पक्षीय उमेदवार 17 इ. जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टी (मायावती) कडून 1 अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून 1 अर्ज,, महाराष्ट्र नवनिर्माण सेने पार्टीकडून 1 अर्ज, वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून 1 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षाकडून 1, भारतीय जनता पार्टी कडून 4 अर्ज, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून 1 अर्ज, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटणा यांचेकडून 1, शेतकरी संघटनेकडून 1 अर्ज, अपक्ष -25 असे अर्ज खरेदी केले आहेत.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ :  या मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नसून एकूण 5 व्यक्तींनी 8 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत. तसेच आजअखेर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात तीन उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. तर आजपर्यंत 30 व्यक्तींनी 44 नामनिर्देशनपत्रे घेतली असल्याची माहिती कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख व अनिकेत पाटील यांनी दिली.

कराड दक्षिणसाठी उमेदवारी अर्ज 

भारतीय जनता पार्टीकडून 2 उमेदवारांनी 4 अर्ज व अपक्ष उमेदवारांनी 4 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अतुल सुरेश भोसले – भारतीय जनता पार्टी, सुरेश जयवंतराव भोसले – भारतीय जनता पार्टी, गोरख गणपती शिंदे – अपक्ष, विश्वजीत अशोक पाटील – अपक्ष, इंद्रजित अशोक गुजर – अपक्ष, रविंद्र वसंतराव यादव – अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!