आनंदराव चव्हाण विद्यालयातील कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर, ता. कराड येथे आनंदराव चव्हाण विद्यालयामध्ये कलाशिक्षक राजेंद्र पांढरपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास शेतीमित्र अशोकराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक बी. जी. बुरुंगले उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन :कलाशिक्षक राजेंद्र पांढरपट्टे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सृजनशील कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी दिवाळीपूर्वी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्याची आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेतली जाते. सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहात या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन हजारो आकाश कंदिलांची निर्मिती करतात. यावर्षीही विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत शेकडोंच्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रस्ताविक मुख्याध्यापिका ए. एस. कुंभार मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले. तर सौ. सविता पाटील यांनी आभार मानले.