कराड दक्षिण, उत्तरेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

विक्रांत चव्हाण; आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना 

कराड/प्रतिनिधी : – 

लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये गट निवडणुकीपेक्षा पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाली होती. त्यानुसार आता विधानसभेला या दोन्ही मतदारसंघातील पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या 20 गावांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष उपक्रम घेण्यात आले असल्याची माहिती कराडचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

पत्रकार परिषदेत दिली माहिती : येथील प्रांत कार्यालयात आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : श्री. चव्हाण म्हणाले, नुकतीच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सात तपासणी नाक्यांसहीत तापदायक ठरणाऱ्या गावांचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. 

मतदार संख्या व झोनची आकडेवारी : कराड दक्षिणमध्ये 3 लाख 11 हजार 50 तर 39 झोन आहेत. तर उत्तरेत 3 लाख 2 हजार 883 मतदार 44 झोन आहेत. दक्षिणेत दोन हजार 284, तर उत्तरेत एक हजार 739 दिव्यांग मतदार आहेत. दक्षिणेत 8 हजार 470, तर उत्तरेत पाच हजार पाच 941 मतदार वाढले आहेत. दक्षिणेत 342, तर उत्तरेत 356 मतदान केंद्र आहेत. दक्षिणेत दोन हजार 460 कर्मचारी आहेत. त्यात 410 पोलीस, तर 2 हजार 50 मतदान केंद्र कर्मचारी आहेत. उत्तरेत दोन हजार 562 कर्मचारी आहेत. त्यात पोलीस 426 तर दोन हजार 136 मतदान केंद्र कर्मचारी आहेत. लोकसभेला 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेली कराड दक्षिण व उत्तरमधील प्रत्येकी 10 मतदान केंद्र शासनाने काढली आहेत. तेथे जावून मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत.

पुरुष व महिला मतदार संख्या : दक्षिणेत 1 लाख 58 हजार पुरूष, तर 1 लाख 52 हजर 720 महिला मतदार आहेत. उत्तरेत 1 लाख 54 हजार 56 पुरूष तर एक लाख 48 हजार 823 महिला मतदार आहेत. कराड दक्षिणची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, तर उत्तरची मतमोजणी यशवंतराव चव्हाण बुउद्देशीय केंद्रात होणार आहे.

तपासणी नाके व पथकांची नियुक्ती : निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यात सात तपासणी नाके करण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीजवळ किती रक्कम असावी, यापेक्षा ज्याच्याकडे जेवढी रक्कम असेल, त्या सगळ्याचा घोषवारा त्या व्यक्तीला कायदेशीर रित्या मांडता आला पाहिजे. अन्यथा, त्याबाबत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दिव्यांग व जास्त वय असलेल्या म्हणजेच 85 वर्षांच्या पुढील मतदारांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली असून त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!