स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आणखी ४ कोटींचा निधी मंजूर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

रणजितनाना पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी यापूर्वी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात करून आणला होता. या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी 4 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत. तर लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी यापूर्वी 2.55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मंजूर झाला आहे.

एकूण साडे पस्तीस कोटींचा निधी : या दोन्ही कामांसाठी आतापर्यंत एकूण 35 कोटी 55 लाख रुपये निधी मंजूर झाल्याने ही कराड शहराच्या वैभव टाकणारी दोन्ही विकासकामे पूर्ण होण्यात आता कोणतीही अडचण राहिलेली नाही.

दोन वर्षांत सुमारे 275 कोटींचा निधी : याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना रणजीत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वरील दोन कामांसाठी 35 कोटी 55 लाख, तसेच रस्ते आणि अन्य विकासकामांसाठी आतापर्यंत सुमारे 65 कोटी निधी पाठपुराव्याने कराड शहराला मिळाला आहे. यापूर्वीच्या निधीसह मुख्यमंत्र्यांकडून कराड शहरासाठी गेल्या दोन वर्षांत एकूण सुमारे 275 कोटी रुपये निधी मिळाला आहे.

टप्पा क्रमांक दोन साठी 21 कोटी : छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यात येणाऱ्या खुल्या जागेचे क्षेत्र सार्वजनिक व निम सार्वजनिक वापर विभागात समाविष्ट करून गौण फेरफार बदलण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी खुल्या जागेचे क्षेत्र सार्वजनिक व निम सार्वजनिक वापर विभागात समाविष्ट करून त्यासही गौण फेरफार बदलण्यास मंजुरी मिळाली आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर बांधकाम विभागाने सदर जागेच्या मातीची चाचणी घेतली. संपूर्ण डिझाईन केले. त्यावेळी सदर कामासाठी जमिनीत 20 ते 22 फूट फाउंडेशन व राफ्ट घ्यावे लागत असून त्यासाठी प्रचंड खर्च वाढत असल्याचे निदर्शनास आले. सदरची बाब आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्याच्या टप्पा क्रमांक दोन साठी 21 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

78 पालिका कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने मिळणार नेमणूका : याबरोबरच कराड नगर परिषदेतील 78 सफाई कामगारांच्या वारसास वारसा हक्काने लाड कमिटी शिफारशीनुसार नेमणूक मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे सदर प्रश्न मांडला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रविवारी तातडीने आदेशावर सही केली. त्यामुळे 78 कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने लाड कमिटी शिफारशीनुसार नगरपालिकेत नेमणूका मिळणार आहेत.

रस्त्यासाठी 30 लाख रुपये मंजूर : वाखण भागातील ओमकार मेडिकल ते डॉक्टर दीक्षित दवाखाना यादरम्यानचा रस्ता करण्यासाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदरच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे त्यांचे जाहीर आभार मानत असल्याचे रणजीतनाना पाटील यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, मुनीर बागवान सावकार, रमेश जाधव, प्रताप इंगवले, जिल्हा उपप्रमुख अक्षय मोहिते, संजय थोरात, दिलीप पाटील, सुनील शिंदे, गुलाबराव पाटील, सुहास गोतपागर, सागर पाटील, विशाल बसुगडे, रोहित पंडित, सचिन पाटील, विजय गरूड, दादासाहेब पिढीला, काकासाहेब जाधव, तेजस माने, दीपक मोरे, शहर प्रमुख राजेंद्र माने, पार्थ पाटील, अजित भोसले आदी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!