डॉ. दिनेश टेंबे; बापूजी साळुंखे महाविद्यालयात व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
आयुष्यामध्ये आनंदी आणि सकारात्मक राहिल्याने व्यक्ती समाधानी बनते. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती व्यक्ती यशस्वी बनते, असे मत सायकॅट्रिक न्यूरोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट डॉ. दिनेश टेंबे यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य विषयावर मार्गदर्शन : येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय जागतिक मानसिक आरोग्य या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश घाटगे अध्यक्षस्थानी होते.
आयुष्याकडे बघण्याची मानसिकता बदला :मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी आयुष्याकडे बघण्याची मानसिकता बदलून आयुष्यामध्ये आनंदी आणि सकारात्मक राहिल्याने व्यक्ती समाधानी होते, असे सांगून डॉ. टेंभे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला महत्व देणे हे खूप महत्त्वाचे आहे.
‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ :प्राचार्य प्रोफेसर डॉ. सतीश घाटगे म्हणाले, मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी अभिव्यक्ती, भावना विरेचन महत्वाचे आहे. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये आहे त्यामध्ये समाधानी रहावे.
विद्यार्थ्यांच्या पोस्टर व लेखांचे उद्घाटन : यावेळी बी. ए. भाग एक व दोनच्या विद्यार्थ्यांनी सायकॅट्रिक न्यूरोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट मनोवेध क्लिनिक आरोग्य या विषयावर केलेल्या विविध पोस्टरचे आणि विविध लेखांचे उद्घाटन पाहुण्यांचा हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मानसशास्त्र विभागांचे प्रमुख प्रा. सोमनाथ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. स्वाती मोरकळ यांनी, तर प्रा. अरविंद मोहिते यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.