कराड/प्रतिनिधी : –
येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने सांस्कृतिक परंपरा जोपासत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार, दि. 5 रोजी महिलांसाठी सामुदायिक भोंदल्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गोरक्षण बचाव समिती, अध्यक्ष श्री. सुनील अनंत पावसकर यांनी दिली.
भाजी-मंडईतील गोरक्षण संस्थेत रंगणार कार्यक्रम : हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी 4.30 ते 7 या वेळेत कराड भाजी-मंडई येथील गोरक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू : या कार्यक्रमात सहभागी महिलांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उखाणे व लकी ड्रॉ स्पर्धेद्वारे आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.
धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी आयोजन : महाराष्ट्रीयन धार्मिक परंपरा नवीन पिढीला अवगत होवून त्या जोपासल्या जाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या भोंदला कार्यक्रमास परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोरक्षण संस्थेच्यावतीने सौ. संगीता पवार, सौ. ज्योती दंडवते, श्रीमती गीता सूर्यवंशी यांनी केले आहे.