कराड दक्षिणसाठी एक कोटींचा निधी मंजूर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे 12 गावांमध्ये साकारली जाणार विकासकामे

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, या माध्यमातून कराड दक्षिणमधील १२ गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे साकारली जाणार आहेत.

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला यश : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून विकासकामे मंजूर करावीत, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार खासदार भोसले यांनी 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या विकासकामांचा समावेश : या माध्यमातून घोगाव येथील श्री बाळसिद्ध मंदिराशेजारी सभामंडप उभारणी (15 लाख), वाठार येथील श्री बिरोबा मंदिराशेजारी सभामंडप सुधारणा (10 लाख), अंबवडे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी सभामंडप बांधणे (10 लाख), गोवारे येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत विस्तारीकरण व सुशोभिकरण करणे (10 लाख), जुळेवाडी येथील स्मशानभूमी दाहिनी व शेड बांधणे (10 लाख), आटके येथील जाधव मळी येथे स्मशानभूमी दाहिनी व शेड बांधणे (10 लाख), मलकापूर येथील आगाशिवनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सुधारणा करणे (10 लाख), मालखेड येथील स्मशानभूमी दाहिनी व शेड बांधणे (10 लाख), हणमंतवाडी येथील श्री विठलाई मंदिराशेजारी कंपाऊंड वॉल व पेव्हींग ब्लॉक बसविणे (5 लाख), कोळे येथील माळी समाज स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (5 लाख), जिंती येथील खोचरेवाडी श्री महादेव मंदिराशेजारी पेव्हर्स ब्लॉक बसविणे (5 लाख), घराळवाडी येथे श्री जोतिर्लिंग मंदिराशेजारी पेव्हर्स ब्लॉक बसविणे (5 लाख) अशी एकूण 1 कोटी 5 लाखांची विकासकामे होणार आहेत.

विकासकामांना होणार लवकरच प्रारंभ : या विकासकामांना लवकरच प्रारंभ केला जाणार असून, यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल संबंधित गावांमधील जनतेकडून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले जात आहेत.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!