अंबिका मंदिरात श्री नवचंडी याग सोहळा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

ईश्वरपूर (उरूण-इस्लामपूर) ता. वाळवा, जि. सांगली येथील श्री अंबिका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. 7 रोजी ॐ श्री पंचाक्षर माहेश्वर (जंगम) पौरोहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्यातर्फे श्री नवचंडी याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा लाभ सर्व भाविक-भक्तांनी घ्यावा, असे आवाहन पाटण तालुक्यातील (सातारा) तीर्थक्षेत्र श्री धारेश्वरचे मठाधिपती गुरुवर्य श्री डॉ. निळकंठ शिवाचार्य महाराज यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजन : श्री अंबिका माता मंदिरात सालाबादप्रमाने याही वर्षी ग्रामदैवत अंबिकामातेच्या कृपेने नवरात्रोत्सवामध्ये ‘ललित पंचमी’ निमित्त अश्विन शु. पंचमी शके 1946 म्हणजे सोमवार, 7 श्री नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे.

…यांच्या आधिपत्याखाली होणार सोहळा : हा सोहळा गुरुवर्य डॉ. श्री. ष. ब्र. प्र. 108 निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर), गुरुवर्य श्री. ष. ब्र. प्र. 108 शिवानंद शिवाचार्य महाराज (वाळवेकर), गुरुवर्य श्री. ष. ब्र. प्र. 108 महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर), गुरुवर्य श्री. ष. ब्र. प्र. 108 रविशंकर शिवाचार्य महाराज (रायपाटण) यांच्या पवित्र सानिध्यात व त्यांच्या आधिपत्याखाली संपन्न होणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : या वर्षी नवचंडी याग पंरपरेला 17 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आहोत. तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. तसेच या कार्यक्रमास सर्व पंचक्रोशीतील भाविक, भक्तांनी तन-मन-धनाने हातभार लावून हा नवचंडी याग सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी पयत्न करावेत, असे आवाहनही ॐ श्री पंचाक्षर माहेश्वर (जंगम) पौरोहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्यातर्फे मंडळाचे अध्यक्ष मा. मु. पांडुरंग स्वामी, उपाध्यक्ष मा. मु. कुमार स्वामी हिरेमठ, सेक्रेटरी मा. मु. महेश स्वामी, मा. मु. खजिनदार प्रकाश स्वामी यांनी आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा : सोमवार, दि. 7 रोजी पहाटे 5 वाजता अंबिका मातेस अभिषेक व वस्त्र पूजा, सकाळी 7 वाजता दुर्गा सप्तशतीचा पाठ, 8 वाजता प्राथमिक पूजा पाठ, 9 वाजता श्रीयंत्र पूजा व रुद्राभिषेक, 9.30 वाजता कुमारी पूजन, 10 वाजता नवचंडी याग प्रारंभ, दुपारी 12 वाजता मंगल आरती व अशिवधन होणार आहे. या नवचंडी यागाला बसणाऱ्या भाविकांनी आपल्या सोबत पूजेसाठी आवश्यक साहित्य आणावे. अधिक माहितीसाठी मा. मु. श्री. सोमनाथ गणपती जंगम, ईश्वरपूर – (9359107560) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भजनी मंडळांची सेवा : या सोहळ्यात सांगली जिल्हा जंगम महिला रुद्र मंडळ – सांगली, श्री अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ – सांगली, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ – फलटण, वीरशैव महिला रुद्र मंडळ – इचलकरंजी, श्री महादेव महिला रुद्र मंडळ – सांगली, विश्वाराध्य महिला रुद्र मंडळ – मंगळवेढा, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ, तसेच सातारा अखिल भारतीय वीरशैव महिला महासंघ – कोल्हापूर सहभागी होणार आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!