नांदगाव, ता. कराड येथील मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृतीमंच (Matoshri Sindhutai Vishwanath Sukare Smritimanch) व श्वेता 1 ग्रॅम गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच भव्य ‘सिंधू सुगरण’ (Sindhu Sugaran) स्पर्धा संपन्न झाली. पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेल्या 200 वर पाककृती घेऊन महिला स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात ओंड येथील 75 वर्षाच्या आजी प्रभावती ठोके यांच्या ‘नाचणीचे पट्टू’ने प्रथम क्रमांक मिळवला. त्या नांदगावच्या सिंधू सुगरण ठरल्या.
पाककला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद :नांदगाव, ता. कराड येथील मातोश्री सिंधुताई सुकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गतवर्षीपासून पाककला स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. यावर्षीही या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नांदगाव व पंचक्रोशीतील 150 वर महिला स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला.
मान्यवरांची उपस्थिती :स्पर्धेचे उदघाटन प्रा. नरेंद्र सुर्यवंशी, प्रा. हेमंत शेटे, स्नेहल शेटे, विजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वि. तु. सुकरे गुरुजी, माणिकराव थोरात, बालीश थोरात, सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, दिलीप महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन : दरम्यान, शाहिर थळेंद्र लोखंडे यांनी कथा, कविता सादर करीत महिलांचे मनोरंजन केले. आहारतज्ज्ञ वर्षा पाटील यांनी ग्रामीण महिला व त्यांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. नरेंद्र सुर्यवंशी व स्नेहल शेटे यांनी पाककला स्पर्धेचे परिक्षण केले.
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण :दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि. तु. सुकरे (गुरुजी), श्वेता 1 ग्रँम गोल्डचे संचालक विजय कदम, सरपंच हंबीर पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, आण्णासो पाचंगे, अरुण पाटील, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी व स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातून रवीना कांबळे (नांदगाव), वर्षा पाटील (कासारशिरंबे), विद्या कांबळे (नांदगाव), पद्मजा थोरात (ओंड), समृद्धी रोकडे (नांदगाव), दिपाली तांबवेकर (नांदगाव), विद्या पोतदार (नांदगाव) यांना श्वेता 1 ग्रँम गोल्डची आकर्षक बक्षीसे देण्यात आली.