कराड दक्षिणेतील दहा कोटींची विकासकामे प्रगतीपथावर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

‘प्रधानमंत्री ग्रामसडक’अंतर्गत निधी मंजूर; खा. उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून

कराड/प्रतिनिधी : – 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांवर भर देत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosle) आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले (Dr. Atul Bhosle) कोट्यावधींचा निधी आणण्यात यश मिळवले आहे. त्यातील अनेक विकासकामे आज प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात 134 कोटी 38 लाख रुपयांची विकासकामे होणार असून, यापैकी कराड दक्षिणमध्ये 9 कोटी 90 लाख रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभेचे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे.

विकासनिधीसाठी डॉ. अतुलबाबांचे प्रयत्न : कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosle) सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यानुसार त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कराड दक्षिणमधील रस्ते विकासाच्या कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार 9 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या विकास कामांसाठी निधीची तरतूद : सदर निधीतून साकारण्यात येत असलेले एम.आर.एल. 10 एन. एच. 4 ते गोटे विजयनगर ते बिरोबा मंदिर ते विमानतळ रोड (2 कोटी 53 लाख) आणि एम.आर.एल. 11 कोडोली ते वडगाव हवेली ते गणेश नगर रोड (4 कोटी 41 लाख) ही दोन कामे प्रगतीपथावर आहेत. तर एम.आर.एल. 23 एन. एच. 16 ते गोवारे सयापुर टेम्भू एस. एच. 142 ए रोड (2 कोटी 94 लाख) हे काम निविदा प्रक्रिया स्तरावर आहे. या कामांमुळे या भागातील दळणवळणाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!