वार्षिक सभा उत्साहात; सभासदांनी संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा – दिलीपभाऊ चव्हाण
कराड/प्रतिनिधी : –
“जोडोनिया धन उत्तम व्यवहारे” या वचनाप्रमाणे प्रारंभीपासून सर्व सभासद व ग्राहकांनी सहकार्य केल्याने ‘श्री धनलक्ष्मी’ पतसंस्थेची (Shri dhanlakshmi vrat samastha Karad) वाटचाल आज प्रगतीप्रथावर आल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपभाऊ चव्हाण (Dilip Chauhan) यांनी व्यक्त केले.
संस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्री. चव्हाण म्हणाले, संस्थेच्या 117 कोटीच्या ठेवी, 150 कोटीचे खेळते भांडवल, 3 कोटी 34 लाख वसूल भागभांडवल, 32 कोटी 56 लाख गुंतवणूक, 15 कोटी 26 लाख स्वनिधी, 13 कोटी 10 लाख एकूण उत्पन्न व संस्था सुरुवातीपासून नफ्यात आहे.
प्रथम नोटीस वाचन संस्थेचे संचालक व सचिव मोहनराव चव्हाण यांनी केले. संस्थेतर्फे गुणवंताचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अरूणा चव्हाण यांनी केले.
प्रास्ताविक आत्माराम थोरात यांनी केले. हणमंत शिर्के यांनी आभार मानले. या सभेस सर्व संचालक मंडळ, सदस्य व सभासद मोठ्या संस्थेने उपस्थित होते.