सक्षम नेतृत्वाच्या हाती ‘प्रहार’ची धुरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड; आ. बच्चू कडू यांनी घेतला विधानसभेच्या अनुषंगाने जिल्ह्याचा आढावा 

कराड/प्रतिनिधी : –

समाजातील विविध प्रश्नांसाठी लढा देणारे, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणारे आणि हातात घेतलेला मुद्दा तडीस नेऊन तो प्रश्न निकाली काढणारे नेतृत्व अशी जिल्हाभरात मनोज माळी (Manoj Mali) यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याच्या याच कार्याची दखल घेत प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू (MLA bacchon Kadu) यांनी मनोज माळी यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड केली आहे. या निवडीने सातारा जिल्ह्यात प्रहारला एक खंबीर व सक्षम नेतृत्व मिळाल्याने सर्व स्तरातून मनोज माळी यांचे अभिनंदन होत आहे.

मनोज माळी यांचा सत्कार : प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड करण्यात आली आहे. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते राज्यातील पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत मनोज माळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच या निवडीबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.

पक्ष नेतृत्वाकडून कार्याची दखल : मनोज माळी यांनी केवळ प्रहार जनशक्ती पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून केलेले सामाजिक कार्य व विविध सामाजिक प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनांची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मनोज माळी यांना जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचा आढावा : आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्याचा आढावा घेतला.

संघटना मजबूत करण्याच्या सूचना : विधानसभा निवडणुकीपूर्वी सातारा जिल्ह्यातील प्रहार संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आमदार बच्चू कडू यांनी केल्याचे मनोज माळी यांनी सांगितले. 

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, स्वीय सहाय्यक गौरव जाधव, पाटण तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष भानुदास डाईंगडे, बंटी मोरे, जयदीप आचार्य, प्रितेश माने व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार बच्चू भाऊंनी प्रहारच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याने सामाजिक चळवळीला अधिक बळ मिळेल. यापुढे जिल्ह्यातील शेतकरी, युवक, कामगार, पीडित, गोरगरिबांचे आणि दिव्यांगांचे प्रश्न अधिक ताकतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

– मनोज माळी

(जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सातारा) 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!