चित्रकार रवी परांजपे यांची चित्रे कलर प्रेमींना पाहण्याची सुवर्णसंधी
कराड/प्रतिनिधी : –
शाहूनगरी साताऱ्यात भव्य श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले असून या ठिकाणी हजारो ऐतिहासिक वस्तू, चित्रे व अन्य बाबी शिवप्रेमींसाठी खुल्या करण्यात आले आहेत.
निवडक चित्रांचे प्रदर्शन : आता या संग्रहालयात नव्याने भव्य आर्ट गॅलरी उभारण्यात येत आहे. या आर्ट गॅलरीमध्ये प्रसिद्ध चित्रकार कै. रवी पंराजपे यांची श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालयास दिलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन रविवार, दि. 20 सप्टेंबर रोजी भरवण्यात येणार आहे.
सहाय्यक अभिरक्षकांच्या हस्ते उद्घाटन : या चित्रपटदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी 11 वाजता श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय, सातारचे सहाय्यक अभिरक्षक प्रविण शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
कलाप्रेमी, शिवप्रेमींसाठी सुवर्णसंधी : या चित्र प्रदर्शनामध्ये अत्यंत दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याने कलाप्रेमी, शिवप्रेमींसाठी ही मोठी सुवर्णसंधीच आहे. त्यामुळे सर्व सातारकर कलाक्षेत्रातील कलाप्रेमी, मान्यवर, चित्रकार, कलाशिक्षक, विद्यार्थी, तसेच शिवप्रेमी, पत्रकार यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक प्रविण शिंदे यांनी केले आहे.