गणपती विसर्जनादिवशी कृष्णा घाटावर अन्नदान; रणजितनाना पाटील यांच्या दातृत्वाचे गणेशभक्तांकडून कौतुक
कराड/प्रतिनिधी : –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्र परिवाराच्या वतीने अनंत चतुर्दशीला कृष्णा घाटावर गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 50 हजारांवर भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्व भाविकांनी रणजितनाना पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक केले आहे.
गेले दहा वर्षांपासून महाप्रसादाचे आयोजन रणजितनाना पाटील मित्र परिवारातर्फे गेली दहा वर्षे विसर्जन दिवशी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुमारे 50 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेला महाप्रसाद पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता. शेवटच्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत सलग 15 ते 20 तास अखंड महाप्रसाद सुरू होता.
नागरिक, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ : सकाळी कृष्णा घाटावर घरगुती गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिक व महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यांचा लाभ घेतला. बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांनीही लाभ घेतला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांना फूड पॅकेटही देण्यात येत होते.
उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक : गरमागरम शाकाहारी पुलाव आणि दालचा सोबत पाण्याची बाटली असा मेनू होता. सकाळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले व माजी आ. आनंदराव पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन रणजितनाना पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार व गिरीष सिहासने यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. रणजितनाना पाटील यांचे बंधू सचिन पाटील हेही महाप्रसादाच्या नियोजनावर लक्ष ठेवून होते.
मोलाचे सहकार्य : अखंड 15 ते 20 तास सुरू असलेल्या या उपक्रमासाठी रणजितनाना पाटील, सचिन पाटील, सरपंच चंद्रकांत काशिद.रवि भावके, सागर आमले अॅड. दीपक थोरात, आशपाक मुल्ला, नितीन महाडीक, कल्पेश मुळीक, विशाल आचारी, राहुल बर्गे, महेश पाटील, दिलीप पाटील, राहुल टकले, गुलाब पाटील, सर्जेराव पानवळ, स्वाती पिसाळ, स्वप्नील यादव व आपले कराड, गब्बर ग्रुप मित्र परिवार, जेष्ठ नागरिक, छत्रपती शिवाजी संघाच्या सर्व मंडळींनी मोलचे सहकार्य केले.