डॉ. भारत पाटणकर यांच्या भूमिकेला विरोध; कोयना धरण व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेची स्थापना
कोयनानगर/प्रतिनिधी : –
श्रमिक मुक्ती दलात उभी फुट पडली असून कोयना धरणग्रस्तांनी डॉ. भारत पाटणकरांच्या संघटनेबरोबर फारकत घेत कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना काढली आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून कोयना पुनर्वसनाच्या विषयाबाबत करण्यात आलेल्या विविध आंदोलनांचा वापर डॉ. भारत पाटणकर यांनी चुकीच्या पध्दतीने करून संघटना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचे काम केले असल्याचा ठपका कोयना धरणग्रस्तांनी ठेवला ठेवत सावता सुभा मांडल्याने अनेकविध चर्चांना उधान आले आहे.
कोयना धरणग्रस्तांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पुरस्कृत संघटनेची पथ सोडत धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कोयना धरणग्रस्तांनी स्वतः पुढे येत डॉ. भारत पाटणकर व श्रमिक मुक्ती दलाला सोडचिठ्ठी देऊन कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे नेतृत्व चैतन्य दळवी, महेश शेलार व सचिन कदम करणार असून ही संघटना राजकारण विरहीत काम करणार असल्याचा विश्वास कोयना धरणग्रस्तांनी व्यक्त केला आहे. यामुळे श्रमिक मुक्ती दलात मोठी फुट पडली पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय पक्षाला ताकद देण्यासाठी संघटनेचा वापर? : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनचा विषय आजही तसाच प्रलंबित आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी धरणग्रस्तांनी वेळोवेळी धरणे आंदोलने, उपोषण, लाँग मार्च आणि करोना काळात घराच्या दारामध्ये बसून तोंडाला मास्क बाधून सामान्य लोकांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून होते. तसेच सांगली आणि सातारा जिल्हामध्ये जमीन पसंती अर्ज जमा केले होते. विविध गटात, राजकीय पक्षात विभागलेला धरणग्रस्त कोयनेच्या पुनर्वसनचा तिढा सुटण्यासाठी एकत्र झाला होता. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकरांनी धरणग्रस्तांनी उभी केलेली मोट राष्ट्रवादी सारख्या राजकीय पक्षाला ताकद देण्यासाठी वापरल्याच्या संशयावरून धरणग्रस्तांनी या निर्णयाद्वारे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
यापुढे राजकारण विरहित लढ्याचा निर्धार : लोकसभा निवडणुकीवेळी तटस्थ राहण्याची भूमिका धरणग्रस्तांनी घेवूनही संघटनेने राष्ट्रवादीला आपला पाठिंबा देवून कोयना धरणग्रस्तांना भावानिक्म करून त्यांचा वापर राजकारणासाठी वापर केल्याने संतप्त झालेल्या कोयना धरणग्रस्तांनी आपली वेगळी भूमिका जाहीर करून कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य, मार्फत इथून पुढे राजकारण विरहित लढा चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे. तसेच ज्यांना कोयना पुनर्वसनचा विषय राजकारण विरहित लढ्यातून मार्गी लावायचा आहे, त्यांनी एकत्रित येण्याचे आवाहनही केले. यासाठी सात जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या कोयना धरणग्रस्तांची राज्यस्तरीय बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचेही चैतन्य दळवी, सचिन कदम व महेश शेलार यांनी सांगितले.
कोयना धरणग्रस्थांची लक्षणीय उपस्थिती : या बैठकीला प्रवीण साळुंखे, विनायक शेलार, सिताराम पवार, अनिल देवरुखकर, सलीम शिकारी, शिवाजी कांबळे, निवृत्ती सपकाळ, आनंद ढमाळ, तानाजी बबले, नथुराम कोळेकर, डी. के. साळुंखे, जयराम कांबळे, परशुराम शिर्के, राजाराम जाधव, रामचंद्र कदम, धोंडीबा कदम, बाजी लाड, अनुसया कदम, निर्मला बेबले, सविता लोखंडे, रंजना जाधव, गजराबाई थोरवडे, रामचंद्र देसाई, बबन पवार आणि धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकारण विरहीत संघटना चालवू : कोयना धरणग्रस्तांचा प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी एकत्रित झालेले धरणग्रस्त इथून पुढे कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेमार्फत राजकारण विरहित लढा चालू ठेवून यश मिळवतील. आम्ही कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न राजकारण विरहीत संघटना चालवून सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचा निर्धार चैतन्य दळवी, महेश शेलार व सचिन कदम यांनी व्यक्त केला आहे.